माथेफिरूच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू : चौघे जखमी
भिवंडी : एका माथेफेरूने केलेल्या चाकू हल्लत दोघा जणांची हत्या झाली असून चार जण जखमी आहेत. जखमींमध्ये मयताची पत्नी व तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्ला करणार्या माथेफेरूचे नाव आहे. भिवंडीतील शांतीनगर परीसरातील खान कंपाऊंड गैबी नगर येथील रहेमनीया मस्जिद परिसरातील एका चाळीत राहणार्या परीवारावर शुक्रवारी हे संकट कोसळले.आरोपीच्या हल्ल्यात कमरुजमा मोहम्मद इस्लाम (42) व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान (29) या दोघांचा मृत्यू झाला.
अचानक शिरून केला हल्ला
माथेफेरू आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी याने कमरुजम्मा मोहम्मद इस्लाम अन्सारी याच्या घरात शिरून चाकूने त्यावर हल्ला केला असता घरातील आरडाओरडा नंतर शेजारी राहणारा इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर हा त्या ठिकाणी आला. माथेफेरूने त्यावर व घरातील कमरुजमा ची पत्नी हसीनाबानो, मुले रेहान, आरिफा व आरीबा यांच्यावर सुध्दा चाकू हल्ला करीत सर्वांना जखमी करीत रक्तबंबाळ केले.या गदारोळा नंतर परिसरातील नागरीक धावून येत त्यांनी हल्लेखोर आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी यास पकडून ठेवत या घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना दिली असता पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले तर नागरीकांनी सर्व जखमींना स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी कमरुजमा मोहम्मद इस्लाम व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान हे मयत झाल्याचे घोषित केले तर जखमी पत्नी व मुलांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात रवाना केले आहे.



