सुका मेवा विकणार्या प्रतिष्ठांनावर धाडी : प्राप्ती कर चोरीचा संशय
लुधियाना : महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि जम्मू आणि काश्मीरमधील सुका मेवा विक्री करणार्या कंपनीच्या कार्यालयासह निवासी मालमत्तांवर कर चोरीचा संशय व्यक्त करीत प्राप्ती कर विभागाने छापे टाकल्याने खळळ उडाली. लुधियाना येथील केसरगंज मंडीमध्ये एका कंपनीच्या कार्यालयात प्राप्तिकर खात्याचे अधिकारी गुरुवारीच दाखल झाले होते. त्यानंतर कारवाई सुरू झाली. दोन कंपन्या बदाम, काजू, किशमिश, पिस्ता इत्यादी सुका मेव्याची विक्री करतात. एका कंपनीची अमृतसर आणि दिल्लीत मुख्य कार्यालये आहेत. दुसर्या कंपनीचे मुख्यालय जम्मू येथे आहे. देशाच्या विविध राज्यांत दोन्ही कंपन्यांची कार्यालये आहेत. सुका मेव्याशिवाय कंपन्यांचा मोठा ऑनलाइन व्यवसायही असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कर चोरीचा दाट संशय
कंपन्यांनी प्रत्यक्ष विक्री आणि नफ्याचे आकडे लपवून प्रचंड करचोरी केल्याचा प्राप्तीकर खात्याला दाट संशय आहे. मुंबई, अमृतसर, दिल्ली आदी शहरांमधील कार्यालयांमध्ये छापे टाकले आहेत. ही कारवाई आणखी 1-2 दिवस चालू शकते, असा अंदाज आहे.

कर चुकविण्यासाठी…
मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तीकर विभागाचे पथक आयात-निर्यातीचा व्यवसाय असलेल्या मोठ्या व्यक्तीच्या शोधात आहे. या व्यक्तीची कंपनी ही पंजाबमधील क्रमांक एकची असल्याचे समजले जाते. ही कंपनी कर चुकवण्यासाठी बिल न करता रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार करीत असल्याचा विभागाचा संशय आहे. हे गट प्रत्यक्ष विक्री आणि नफा दडवून ठेवून कर चुकवत असल्याचा संशय असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
