आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न ; दबावही वाढला : समीर वानखेडे


मुंबई : आर्यन खान प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेल्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी भेट दिली. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होत असून दबाव आणला जात आहे त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी मागणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केली. संपूर्ण खानदान बोगस आहे, अशी भाषा मीडिया समोर करणं योग्य नाही. हे लोक माझी बेईज्जती करण्याचे काम करत आहेत. बोगसचा अर्थ काय होतो सर? मला बेईज्जत केलं जात आहे. माझा युनिफॉर्म काढून घेणार, माझी नोकरी हिरावून घेणार असे धमकावले जात आहे. सर मला राष्ट्रपती नियुक्त करतात. जर मी काही चुकीचं काही केलं असेल तर राष्ट्रपती त्यावर न्याय करतील आणि तुम्ही न्याय कराल. रोज सकाळी 8 वाजता आणि 10 वाजता पत्रकार परिषद घेतली जात आहे. माझ्या कुटुंबाबत बोललं जात आहे. प्रायव्हेट गोष्टी सांगितल्या जात आहेत. आम्हाला टार्गेट केलं जात आहे. या गोष्टी बंद होत नाहीत. रोज मीडियाला बोलावून टीका केली जात आहे. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं तुम्हाला निवेदन आहे की कायद्याच्या चौकटीत राहून जे काही असेल त्याचं निवारण करा, अशी विनंतीच वानखेडे यांनी केली.

कागदपत्रे दाखवली
वानखेडे अत्यंत अवेशाने बोलत होते. पोटतिडकीने आपलं म्हणणं मांडत होते. यावेळी त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हलदर यांना जातीशी संबंधित सर्व कागदपत्रे हलदर यांना दाखवली. ज्ञानदेव वानखेडे यांनीही त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड हलदर यांना सांगितली.

तीन लोकांकडून घराची रेकी
समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर क्रांती रेडकरने मीडियाशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. तीन लोकं आमच्या घराची पाळत ठेवत आहेत. त्यांनी आमच्या घराची रेकी केली आहे. आम्हाला सोसायटीकडून कळलं. ते लोक आमच्या घराची विचारपूस करत होते. त्यांनी नंबरही दिले. पोलीस असल्याचं सांगत होते. आम्ही पोलिसांना फोन केला. तुमच्याकडून कोणी आलं होतं का विचारलं. पण ते नाही म्हणाले. म्हणून आम्ही ट्रु कॉलरवर चेक केले. ते भलत्याच माणसांचे होते. आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि नंबर पोलिसांना दिले आहेत. लवकरच कळेल ती लोकं कोण होती? असा क्रांतीने सांगितलं.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !