फैजपुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; तरुणाविरोधात गुन्हा


फैजपूर : शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाविरोधात गुन्हा दाखल
शहरातील एका भागात 14 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियासह राहते. शनिवार, 30 ऑक्टोबर रोजी रात्री अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना गावातील अर्जुन सिध्दार्थ केदारे (रा.फैजपूर) याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार अल्पवयीन मुलीने कुटुंबियातील सदस्यांना सांगितला. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी अर्जुन केदारे याच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहा.निरीक्षक सिद्धेश आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहेत.




 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !