वरणगाव महामार्गावर अपघात : भरधाव तवेराच्या धडकेत पादचारी जखमी
वरणगाव : वरणगाव बायपास महामार्गावर भरधाव वेगात तवेरा गाडीची पायी चालणार्या पादचार्यास धडक लागली. या घटनेत पादचारी जखमी झाल्याने वाहन चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल. फिर्यादी शेख मुख्तार शेख सत्तार (28, शावलिया मज्जीदजवळए तांबापूराए जळगावत्र हे बायपास महामार्गावरून पायी चालत असताना तवेरा गाडी (क्रमांक एम.एच.20 डी.व्ही.0617) वरील चालक (नाव, गाव माहित नाही) यांनी रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून शेख मुख्तार यास जबर धडक दिली. या धडकेने मुख्तार यांचा डावा पाय निकामी तर उजवा पाय गंभीर जखमी झाला. तवरो चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.तपास सहा.निरीक्षक आशीष अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागेंद्र तायडे करीत आहेत.
