तर पाकिस्तानावर कधी अनुबॉम्ब पडेल सांगता येत नाही


योगी आदित्यनाथ : रावेरात आमदार हरीभाऊ जावळेंच्या प्रचारार्थ सभा

रावेर : यापुढे भारताकडून पाकिस्तानवर केव्हा अनुबॉम्ब पडेल हे सांगता येणार नाही म्हणून त्यांचे पंतप्रधान हिंदुस्थानच्या भीतीने जागतिक मदत मागत फिरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरातील कलम 370 हटवले असून लवकरच पाक व्याप्त काश्मीर सुध्दा भारताचा होणार असल्याचे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील सभेत केली. छोरीया मार्केटच्या मैदानावर गुरुवारी दुपारी भाजपा उमेदवार हरीभाऊ जावळे यांच्यासह खान्देशातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार हरीभाऊ जावळे, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अ‍ॅड.रोहिणी खडसे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, राजेंद्र फडके, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकोळे, उद्योजक श्रीराम पाटील, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, पल्लवी महाजन, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, हिरालाल चौधरी आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !