पुण्यात आयएएस अधिकार्‍याकडे 44 लाखांची चोरी


पुणे : पुण्यातील रहिवासी मात्र जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत एका आयएएस अधिकार्‍याच्या पुण्यातील घरातून लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले 43 लाख 50 रुपये किंमतीच्या दागिन्यांसह अडीच लाखांची रोकड बंद घरातून चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दत्तात्रय डोईफोडे यांनी मुंढवा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची साधली संधी
दत्तात्रय संभाजी डोईफोडे (64, रा. ज्ञानेश्वरी बंगला सर्व्हे नं. 55, प्लाँट नं. 24, डेक्कन पेपरमिल रोड, मुंढवा) हे महसूल विभागातून वरीष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत आणि ते पुण्यात कुटुंबीयांसह राहातात. त्यांचे चिरंजीव सागर डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. गुरुवारी लक्ष्मीपूजन असल्याने दत्तात्रय डोईफोडे यांनी मुंढवा परीसरातील आपल्या ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यात तीन पिढ्यांपासून असलेले जवळपास सर्वच पारंपरीक दागिने लक्ष्मीपूजनासाठी ठेवले. त्यात मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगडया, तोडे, ब्रेसलेट, पाटल्या तसेच हिर्‍याचे सेट आणि रोख 2 लाख 50 हजार रूपयांचा समावेश होता. डोईफोडे यांच्या घराला गुरुवारी रात्री 11.30 ते शुक्रवारी पहाटे 4 पर्यंत कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत ऐवजासह रोकड लांबवली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !