ज्यादा परताव्याच्या आमिषाने सहा लाखांना गंडा


नाशिक : ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष देत गुंतवणूकदाराला सहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयित आर. डी. ट्रेडिंग सोल्युशन कंपनीचा संचालक रवींद्र पंडित दराडे, मनीषा दराडे यांच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईनाका पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पोलिसांनी दिलेली माहिती आणि ललिता सोनवणे (रा.इंदिरानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित दराडे दाम्पत्याने संगनमत करत आर. डी. ट्रेडिंग सोल्युशन या कंपनीत रक्कम गुंतविल्यास 10 महिन्यांत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष देत सोनवणे यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सोनवणे यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर कुठलाही जादा परतावा आणि गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता फसवणूक केली अशी तक्रार पोलिसांत दिली. मुंबईनाका पोलिसांनी संशयीत कंपनीच्या संचालक दराडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरीष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !