पारोळ्यात आमदार निलेश राणेंचा पुतळा जाळला : आक्षेपार्ह ट्वीटचा निषेध


पारोळा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट करणार्‍या आमदार निलेश राणे यांचा पारोळा शहरातील शिवसैनिकांनी निषेध नोंदवत गुन्हा दाखल करण्याबाबत पारोळा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी आमदार निलेश राणे यांचा पुतळा महामार्गावर जाळण्यात आला.

यांची आंदोलनप्रसंगी उपस्थिती
यावेळी निलेश राणे मुर्दाबाद आदी घोषणा देण्यात आल्यात. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र कासार, युवासेना उपतालुका प्रमुख समाधान मगर, शहरप्रमुख अशोक मराठे, दलित सेना अध्यक्ष राजू जावरे, तालुकाध्यक्ष अशोक कापडणे, उपशहर प्रमुख सावन शिंपी, युवा सेना तालुका समन्वयक चेतन पाटील, आबा महाजन, बबलू पाटील, विलास वाघ, राकेश जावरे, गोपाल देशमुख यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, सत्यवान पवार, सुनील साळुंखे, सुनील वानखेडे, विजय भोई, साबे, राहुल पाटील, किशोर भोई आदींनी बंदोबस्त ठेवला होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !