पिताच निघाला नराधम : अत्याचारातून अल्पवयीन तरुणी सात महिन्यांची गर्भवती


नवी दिल्ली : पिता-पूत्रीच्या नात्याला कलंक लावत नराधम पित्याने केलेल्या अत्याचारातून अल्पवयीन तरुणी सात महिन्यांची गर्भवती राहिली. मध्य प्रदेशच्या खजरानामध्ये हा संतापजनक प्रकार घडला. मुलीने आजीला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे.

मार्च महिन्यापासून पीडीतेचे शोषण
पीडित मुलीच्या वडिलांनी आणि शेजारी राहणार्‍या एक व्यक्तीने मुलीवर बलात्कार केला. मार्च 2021 पासून हे दोघेही तिचं लैंगिक शोषण करत आहेत. घाबरलेल्या मुलीने इतके महिने याबाबत कोणालाच सांगितलं नाही. शेवटी त्रास सहन होत नसल्याने तिने आपल्यासोबत घडत असलेला धक्कादायक प्रकार आजीला सांगितला. आजीला या घटनेची माहिती मिळताच तिने लगेचच पोलिसांत धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

पीडीता सात महिन्यांची गरोदर
खजराना पोलीस ठाण्याचे अधिकारी दिनेश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 15 वर्षांच्या मुलीला तिची आजी पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आली होती. तिची नात ही सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. जेव्हा पोलिसांनी मुलीकडे याबाबत चौकशी केली तेव्हा तिने वडील आणि शेजारी राहणारा व्यक्ती सातत्याने आपल्यावर बलात्कार करत असल्याची माहिती दिली. दोघेही नेहमी घाबरवत असत तसेच जीवे मारण्याची धमकी देत असत, असेंमुलीने सांगितलं.

पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींना केली अटक
पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2021 पासून वडील आणि शेजारी राहणारा कुंदन आपल्यावर बलात्कार करत आहे त्यामुळे याची माहिती आता आजीला दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींना अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तसेच मुलीची मानसिक अवस्था आता ठिक नसल्याने तिचं समुपदेशन करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !