तरुण शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या
पाचोरा : तरुण शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील जामने येथे घडली. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी या वैमनस्यातून तरूणाने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले.
शेतातच घेतला गळफास
जामनेर तालुक्यातील जामने येथील युवा शेतकरी राहुल राजेंद्र पाटील (वय – 26) हा शेतात गेलेला असताना शेडच्या लोखंडी रॉडला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आमहत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आला. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. तत्पूर्वी राहुल राजेंद्र पाटील यांनी वडीलांकडून पाच एकर जमीन कसण्यासाठी घेतली होती. त्यात त्यांनी कापसाची लागवड केली मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक वाया गेले. त्यात शेती कसण्यासाठी झालेला खर्च खर्चही निघणार नाही व कर्जफेड कशी करावी या वैमनस्यातून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. वैद्यकीय अधीक्षक यांच्या खबरीवरून पिंपळगाव हरे पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहा.निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय विजय माळी हे करीत आहेत. मयताच्या पश्चात्य वृध्द आई- वडील, एक भाऊ, एक बहीण, पत्नी व अडीच वर्षाची एक मुलगी असा परीवार आहे.

