जर्मनी गँगकडून खंडणीचाच तगादा : 24 वर्षीय युवकाची आत्महत्या
इचलकरंजी : अन्यायाबाबतची चिठ्ठी स्टेटसला ठेवत तरुणाने आत्महत्या केली. आदित्य बळवंत महाद्वार (24, रा.जवाहरनगर) असे मयताचे नाव आहे. जर्मनी गँगकडून खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून या युवकाने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशीचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
राहत्या घरातच आत्महत्या
जवाहरनगरात आदित्य महाद्वार हा आई, वडिल यांच्यासमवेत राहण्यास आहे. रविवारी दुपारी त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्त्या केली. आत्महत्तेपूर्वी त्याने मोबाईलवर मृत्यूपूर्वीची चिठ्ठी स्टेटसला ठेवल्याचे उघडकीस आले आहे. काही मित्रांना ही चिठ्ठी बघून त्याच्या घरी पोहोचेपर्यंत आदित्यने आत्महत्या केली होती. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत जर्मनी गँगमधील चौघांची नावे असून यापूर्वीही त्यांनी सोन्याची अंगठी व 25 हजार रुपये धमकावून काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर पुन्हा खंडणी न दिल्यास कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे हे कृत्य केल्याचे लिहून खाली सही केली आहे. ही चिठ्ठी सोशल मिडीयावर व्हायरल झाली. पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे.

