राष्ट्रवादी प्रवक्ते मलिकांच्या खळबळजनक आरोपांमुळे वाढल्या अडचणी : न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश


मुंबई : राजकीय पटलावर दररोज विविधांगी आरोप करून राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक हे खळबळ उडवून देत आहेत. अलिकडचे मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केल्याने ते चर्चेत आले होते. त्यातच मलिक यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याविरोधातही अनेक आरोप केल्यानंतर कंबोज यांनी मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल व्हावा, अशी मागणी केली. याबाबत कोर्टाने नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिल्याने मलिक यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

मोहित कंबोज यांची न्यायालयात धाव
मोहित कंबोज म्हणाले की, मी गेल्या महिन्यात मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात यावा, यासाठी कोर्टात धाव घेतली होती. अब्रुनुकसानीप्रकरणी मलिक यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर खोटे आरोप केले होते. पुरावा नसताना त्यांनी हे खोटे आरोप केल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे. मुंबई ड्रग्स प्रकरणामध्ये आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण झाले होते. तसेच या सर्व अपहरण नाट्यामागे मोहित कंबोज हे मास्टर माइंड असल्याचा दावा मलिक यांनी केला होता, यामुळे वातावरण तापले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !