धक्कादायक ! : समीर वानखेडेंच्या मातोश्रींचे दोन्ही धर्माच्या मृत्यूचे दाखले !


मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आज पुन्हा नवीन आरोप लावत त्यांच्या आईच्या मृत्यूची दोन धर्मांची स्वतंत्र नोंद करण्यात आल्याची कागदपत्रे जाहीर केली आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली.

नवीन आरोपामुळे उडाली खळबळ
राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गुरुवारी पुन्हा एक नवीन आरोप लावला आहे. महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रे नवाब मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केली आहेत. वानखेडे यांचा हा नवीन फर्जीवाडा असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.



डेथ रेकॉर्डमध्ये मुस्लीम व हिंदू अशी नोंद
समीर वानखेडे यांच्या आई जायदा ज्ञानदेव वानखेडे यांच्या मनपाच्या डेथ रजिस्टरी रेकॉर्डमध्ये मुस्लिम अशी नोंद आहे, तर डेथ रेकॉर्डला हिंदू अशी नोंद असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे. डेथ रजिस्टरमध्ये मृत्यू दिनांक 16 एप्रिल 2015 अशी नोंद आहे. यामध्ये मुस्लिम अशी नोंद झाली आहे. तर डेथ रीपोर्ट 17 एप्रिल 2015 रोजीचा आहे. यात जायदा वानखेडे यांची हिंदू असल्याची नोंद करण्यात आली आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !