बीएचआर घोटाळा : सुनील झंवरला अटकपूर्व जामीन मंजूर
जळगाव : बीएचआर घोटाळा प्रकरणी दाखल वेगवेगळ्या तीन गुन्हांपैकी शिक्रापूर येथील गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरला उच्च न्यायालयाने गुरूवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. बीएचआरप्रकरणी शिक्रापूर येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी झंवरने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यात अॅड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडली होती.