15 लाखांची रोकड असलेली बॅग घेवून भामटे पसार : …. या शहरात घडली घटना
जालना : 15 लाखांची रोकड हिसकावून दुचाकीवरून भामटे पसार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास जालना शहरात घडली. जिल्हा मध्यवर्ती मुख्य शाखेतून गोलापांगरी येथील शाखेसाठी दोन बँक कर्मचारी स्कूटीवरून जात असताना हा प्रकार घडला. सुभाष उत्तमराव गोडबोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाठलाग करीत साधला डाव
चोरट्यांनी रक्कम घेऊन जाणार्यांवर पाळत ठेवून बँक कर्मचार्यांचा पाठलाग केला. बँक कर्मचार्यांची दुचाकी गोलापांगरी जवळील एका इंग्रजी शाळेजवळ आली. तेव्हाच दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवून मारहाण केली व पैशाची बॅग घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.

