राजकारणीही बाप माणूसच ! मुलीच्या विदाईप्रसंगी संजय राऊत गहिवरले


मुंबई : शिवसेना खासदार राऊत आणि नार्वेकर कुटुंबातील लग्नसोहळा गेल्या 2 दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत असतानाच राऊत यांच्यातील बापमाणसाचे दर्शन घडविणारे फोटो अन् व्हिडिओही समोर आले आहेत. मुलगी पूर्वशी हिच्या लग्न सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळेंसमेवत आनंदाने डान्स करणारा बाप दुसर्‍याच दिवशी मुलीची पाठवणी करताना भावूक झाल्याचे दिसून आले.

अन् कंठ आला दाटून
पूर्वशीच्या मातोश्रींच्या डोळ्यातील पाणी पाहून संजय राऊत यांचाही कंट दाटला होता. त्यावेळी मुलीच्या पाठीवर हात ठेवत संजय राऊत यांनी स्वत:च्या डोळ्यातील अश्रू लपवले मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघ पक्षाचा आक्रमक नेताही भावूक झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं.



राजकारणीही बाप माणुसच
राजकारणात गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या आक्रमक आणि रोखठोक शैलीने परिचीत असलेले संजय राऊत मुलीच्या लग्नात वेगळचे दिसले. कधी नाचले, कधी लगीनघाईमुळे व्यस्त दिसले, कधी पाहुण्यांच्या स्वागत रमले तर मुलीची पाठवणी करताना डोळ्यात अश्रू साठवून मनातून रडले. शेवटी राजकारणीही बापमाणूसच असते, हे सर्वांनीच पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !