भुसावळातील एसटीच्या 13 कर्मचार्यांना निलंबनाची नोटीस
भुसावळ : एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. या कर्मचार्यांनी कामावर परतावे, यासाठी महामंडळाने गेल्या आठवड्यात 14 जणांना निलंबनाची नोटीस बजावली होती. त्याचा उपयोग झाला नाही. यानंतर सोमवारी पुन्हा 13 कर्मचार्यांच्या नोटीस आगार प्रमुखांकडे प्राप्त झाल्या आहे. या नोटीस कर्मचार्यांना मंगळवार बजावण्यात आल्या. यामुळे आतापर्यंत 27 कर्मचार्यांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.
288 कर्मचारी संपात सहभागी
एसटी महामंडळाच्या भुसावळ आगारातील 288 कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. सरकार आणि कर्मचार्यांमधील चर्चा यशस्वी न झाल्याने हा संप सुरूच आहे. दुसरीकडे कर्मचार्यांनी कामावर परतावे यासाठी सरकारकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याने निलंबनाचा धडाका सुरू आहे. गेल्या आठवड्यात भुसावळातील 14, तर सोमवारी पुन्हा 13 जणांच्या नोटीस निघाली. दरम्यान, सोमवारी बससेवा सुरू होतील अशी चिन्हे होती. त्यानुसार बसस्थानक आणि आगारात पोलिस बंदोबस्त ठेवला होत मात्र पण एकही बस बाहेर पडली नाही. दरम्यान एस.टी. कर्मचार्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत असून त्यांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत असून आर्थिक भूर्दंडही सोसावा लागत असल्याचे चित्र आहे.


