धक्कादायक ! : लग्न होत नसल्याने अविवाहित तरुणाने ब्लेडने गुप्तांग कापले
पश्चिम चंपारण : कुटुंबात लग्न जमत नसल्याने तरुणाने आपला प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापल्याने खळबळ उडाली. बिहारमधील बेतिया भागात ही घटना घडली. तरुणावर जीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी तरुणाचे नाव इरफान शेख आहे. तो काला बरवा गावात राहणारा आहे. तरुणाने दुकानातून ब्लेड खरेदी केलं आणि स्वत:चे गुप्तांग कापून घेतलं. या तरुणाने असं का केलं, याबाबत तो काहीही सांगत नाही. तसेच इरफानशिवाय त्यांना पाच मुली असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्यांनी पक्कं घर देखील बांधलेलं नाही. त्यामुळे इरफानचं लग्न करीत नव्हतो असं कुटुंबीयांनी सांगितलं. यादरम्यान इरफानने असं धक्कादायक विकृत कृत्य केलं. या कृत्यामुळं कुटुंबीयांना धक्का बसला.
तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, इरफान पोखरामध्ये मजुरीचं काम करतो. दोन दिवसांपूर्वी त्याने वडिलांना फोन करून घरी येत असल्याचं सांगितलं होतं. एक दिवसाआधीच नेपाळ पोलिसांनी कुटुंबियांना फोन करून मुलगा जखमी असल्याचं सांगितलं. कुटुंबीय रुग्णालयात पोहोचेपर्यंत इरफान तेथून पळून गेला होता. यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. यादरम्यान भारत-नेपाळ सीमेजवळ इरफान सापडला, नंतर त्याला घेऊन वडील बेतिया येथे पोहोचले आणि त्याला जीएमसीएचमध्ये दाखल केलं.

तरुणाचे लग्न करणे ठरत होते अवघड
इरफानने सांगितले, अचानक काहीतरी डोक्यात आलं म्हणून दुकानात जाऊन ब्लेड खरेदी केलं आणि आपल्या हातानेच स्वत:चं गुप्तांग कापून टाकलं. इरफानच्या आईने सांगितले की, पाच मुली असल्यामुळे आणि पक्के घर देखील नसल्यामुळे त्याचं लग्न करणं अवघड झालं होतं. सध्या रुग्णालयात इरफानवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती मिळत आहे, अशी बातमी हिंदी न्यूज 18ने दिली आहे.
