लग्नाच्या वरातीत गोळीबार : पोलिसांकडून आता चौकशीला वेग


ठाणे : लग्नाच्या वरातीत मोठ्या बंदुकीतून एकाने गोळीबार केल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. अंबरनाथ येथे मलंगगड परीसरातील हाजीमलंगवाडी गावात 29 नोव्हेंबर रोजी एका लग्न सोहळ्यात शिवाजी पाटील नामक व्यक्तीने मोठ्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. त्याचा व्हिडीओ आता समोर आला असून याच व्हिडिओमध्ये एक तरुण हातात बंदूक घेऊन उभा असल्याचं दिसत असून त्याच्या बाजूला याच गावातील उपसरपंच देखील उपस्थित आहे.

पोलिसांकडून तपासाला वेग
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिललाईन पोलिसांनी त्याची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. ज्या बंदुकीतून हा गोळीबार करण्यात आला ती बंदूक नेमकी कोणत्या प्रकारची होती? यासह सर्वच गोष्टींचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेत दोषी असणार्‍यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !