अवैध वसुली प्रकरण : पोलिस अधिकार्‍यावर कारवाईसाठी आमदार मंगेश चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार


चाळीसगाव : कन्नड घाटात अवजड वाहने सोडण्यासाठी पोलिसांकडून घेतल्या जात असलेल्या लाचेबाबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः ट्रक चालक होत स्टींग ऑपरेशन केले होते. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चौघा कर्मचार्‍यांचे निलंबन केले असलेतरी अवैधरीत्या होणार्‍या वसुलीला जवाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

कारवाईसाठी अखेरपर्यंत पाठपुरावा करणार
कन्नड घाटातील अवैध वसुलीचा प्रकार आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झाला होता. या प्रकरणी चार पोलिस कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे मात्र अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन दोषी अधिकार्‍यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले. या संदर्भात राज्याच्या पोलिस महासंचालकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांची भेट झाली नाही, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !