नात्याला काळीमा : नराधम भावाचा तीन वर्षीय बहिणीवर अत्याचार


पिंपरी : तीन वर्षीय बहिणीवर नराधम अल्पवयीन भावानेच लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला असलातरी नुकतीच ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडीत मुलीच्या आईने गुरूवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपी विधीसंघर्षीत बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरी कुणी नसताना दुर्दैवी घटना
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीचे आई-वडील ऑगस्ट महिन्यात (निश्चित तारीख माहिती नाही) कामानिमित्त गेले असताना भावानेच आपल्या सख्ख्या तीन वर्षीय बहिणीवर अत्याचार केला. गुरूवारी मुलीला त्रास झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीला विचारले असता, तीने घडला प्रकार सांगितला. आरोपीविरोधात शारीरीक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !