17 हजारांची लाच भोवली : पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात
ठाणे : 17 हजारांची लाच मागणी पोलिस नाईकाच्या अंगलट आली असून एसीबीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. किरण गोरले असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. संशयीत शहापूर पोलीस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून सेवेत आहेत. भंगाराच्या व्यवसायासाठी शहापूरच्या एका 32 वर्षीय व्यावसायीकाकडे 17 हजारांच्या लाचेची मागणी गोरले यांनी केली होती. याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी केल्यानंतर आरोपीने साहेबांच्या नावाने 15 हजारांची व स्वतःसाठी दोन हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) संशयीताला अटक केली. त्याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
