सोमवारपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौर्यावर
14 डिसेंबर रोजी मराठवाड्याची बैठक औरंगाबादला : दहा दिवसांचा दौरा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारपासून राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. बाळा नांदगावकर यांनी राज यांच्या दौर्याबाबतची माहिती दिली. राज ठाकरे 6 डिसेंबरपासून आपल्या दौर्याची सुरुवात पुण्यातून करणार आहेत. तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर 14 डिसेंबरपासून राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू होणार आहे. ते 14 रोजी औरंगाबादला दाखल होतील. येथे मराठवाड्यातील नेत्यांची बैठक होईल. त्यानंतर 16 डिसेंबरला पुण्यात पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्षांतर्गत विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
पुढील भूमिका राज ठाकरे ठरवतील : नांदगावकर
आतापर्यंत मनसेने सर्व निवडणुका या स्वबळावरच लढल्या आहेत आतादेखील तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. मात्र, पुढे काय होईल हे आता सांगता येत नाही. मनसेची पुढची भूमिका ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच ठरवतील, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.


