भुसावळात वीजपुरवठा गुल : व्यापार्यांचा संताप
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील टिंबर मार्केट, श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल भागातील वीजपुरवठा शनिवारी सकाळी 9.45 ते 3 वाजेदरम्यान तब्बल सव्वा सहा तास खंडीत झाल्याने व्यापारी, दुकानदारांसह व्यावसायीकांची मोठी गैरसोय होवून संताप व्यक्त करण्यात आला. महावितरणने मात्र या भागात मेंटेनन्सच्या कामासाठी वीजपुरवठा खंडीत होणार असल्याचे यापूर्वीच जाहिर केले होते मात्र एकाच दिवशी सहा तास वीज गुल झाल्याने व्यावसायीकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. दोन, तीन तास वीजपुरवठा खंडीत करुन कामाचे विभाजन करावे, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.


