पाचोरावासीयांना घरपट्टीत 50 टक्के सुट द्यावी
काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांची मागणी : कोरोनामुळे व्यापार उद्ध्वस्त
पाचोरा : कोरोना महामारीमुळे उद्ध्वस्त झालेली व्यापारपेठ त्यामुळे शहरातील घरांचा एकत्रीकरण टॅक्समध्ये 2024 पर्यंत 50 टक्के सुट द्यावी, अशी मागणी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
काँग्रेस करणार नागरीकांमध्ये जनजागृती
कोरोना महामारीमुळे शहरातील सर्वच लहान मोठे व्यापार बंद होते त्यामुळे पाचोरा शहरातील राहणारे नागरीक हे लहान मोठे व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, कामगार असे आहेत. यातच नगरपरीषदेने पुढील चार वर्षांचा एकत्रीकरण टॅक्स हा वाढविण्यासाठी हरकती मागविल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी सर्वपक्षीय एकत्र बसून येत्या 2024 पर्यंत ची घरपट्टी मध्ये 50 टक्के सुट द्यावी, अशी मागणी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे ते स्वतः त्याबाबत हरकत घेणार आहेत. पाचोरा नगरपरीषदेच्या सर्व विद्यमान नगरसेवकांनी नागरीकांचा विचार करून तत्काळ घरपट्टीचा एकत्रीकरण टॅक्स 50 टक्के माफ करावा अन्यथा येणार्या निवडणुकीत याचा जाब नगरसेवकांना विचारल्या शिवाय राहणार, असेही सोमवंशी यांनी म्हटले आहे. काँग्रेसकडून याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचेही सोमवंशी म्हणाले आहे.


