अंतुर्ली गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत : काँग्रेसची मागणी
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या पार्श्वभूमीवर अंतुर्ली गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. निवेदनाचा आशय असा की, अंतुर्ली हे गाव मध्यप्रदेश सीमेला लागून असून गावामध्ये बजरंग चौक, बस स्टॅन्ड, बाजार गल्ली, राजे संभाजी चौक तसेच ग्रामपंचायत कार्यालय असून या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावल्यास चोर्यांना तसेच गैरप्रकारांना आळा बसेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
अंतुर्ली गावात ग्रामपंचायतीजवळ दोन बँका असून सतत तेथे व्यापार्यांची वर्दळ असते शिवाय सराफ दुकाने, आठवडे बाजारात होणारी मोठी उलाढाल लक्षात घेता सीसीटीव्ही बसवण्यात आल्याने अप्रिय घटना टळतील अथवा काही विपरीत घडल्यास संशयीतांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून पकडणे सहज शक्य होईल, असा आशावाद निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील सर्व हायमास्टची दुरुस्ती करून ते सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे करण्यात आली. निवेदनावर काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख भैय्या शेख करीम, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल वाडीले, प्रमोद जिरी, फकीरा पाटील, जगन सोनार, अंकित सोनार, गजानन अग्रवाल, विशाल पाटील व ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.


