50 हजारांची लाच भोवली : पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
बारामती : दरोड्याच्या गुन्ह्यात स्कॉर्पिओचा सहभाग असल्याचे सांगत वाहन मालकाकडे 50 हजारांची लाच मागणी करणार्या व हल्ली बारामती सत्र न्यायालयात ‘गार्ड’ची ‘ड्युटी’ संभाळणार्या हवालदारास लाचप्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने खळबळ उडाली. माणिक गदादे असे या पोलिस हवालदाराचे नाव आहे.
लाच मागणीप्रकरणी गुन्हा
गदादे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून एक स्कॉर्पिओ ओढून आणली होती. या वाहनाचा दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्यांनी वाहन मालकाला सांगत वाहन सोडण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. मात्र, अॅन्टीकरप्शनने केलेल्या चौकशीत गदादे यांनी तडजोडीअंती लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारी दुपारी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधिक्षक सुरज गुरव, अपर अधीक्षक सुहास नाडगौड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

