उत्तरप्रदेशातील टँकर चालकाची हेराफेरी : गुजरातमध्ये जाणारे ऑईल परस्पर विकले


साडेबारा लाखांच्या फसवणूक प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा

भुसावळ- खाजगी कंपनीचे राईस ऑईल घेऊन जाणार्‍या टँकर चालकाने रस्त्यातच हेराफेरी करून तब्बल 12 लाख 50 हजार रुपयांचे ऑईल विकल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी टँकर चालक मोहम्मद सद्दाम हुसेन मोहम्मद नाझिम (रा.तवकलपूर, उ.प्र.) विरुद्ध गुरुवारी रात्री भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आंध्रप्रदेशातून गुजरातमध्ये ऑईल नेताना रस्त्याच टँकर चालकाच्या नियत खराब झाल्याने ही घटना घडली.

जीपीएस लोकेशन ट्रेसनंतर गुन्हा झाला उघड
नागा हनुमान ग्रोटेक ओईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे राईस आईल (रीफाइंड) घेऊन टँकरने (क्र.एन.एल.01 एस.सी.271) चालक मोहम्मद सद्दाम हुसेन मोहम्मद नाझिम हा 30 जुलैला आंध्र प्रदेशातून निघाला मात्र टँकर गुजरातमध्ये न पोहोचल्याने कंपनीच्या अधिकार्‍यांनी वारंवार चालकाला मोबाईल लावल्यानंतरही त्याने उत्तर दिले नाही. ट्रकमधील जीपीएस यंत्रणेद्वारे त्याचे लोकेशन भुसावळ आल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक विनोदकुमार रामजी यादव (दिल्ली) हे भुसावळात आले. त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती सांगितली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर टँकर महामार्गालगत एका हॉटेलवर उभा आढळला मात्र टँकर चालक पसार झाला होता. पोलिसांनी तपासणी केली असता टँकरमधील ऑईलदेखील न आढळल्याने टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.