यावल तालुका दक्षता समितीच्या पदाधिकार्यांची निवड
यावल : यावल-रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांची तालुका पातळीवरील दक्षता समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार यावल-रावेरचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली यावल तालुका पातळीवरील दक्षता समितीच्या नियुक्त्या जाहीर केल्या.
उपाध्यक्षपदी नौशाद तडवी
या समितीच्या पदसिद्ध उपाध्यक्षपदी यावल नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांची तर सदस्य म्हणून यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, सदस्य म्हणून यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, अशासकीय सदस्य म्हणून संगीता नितीन चौधरी, महिला सदस्य म्हणून सविता अरुण लोखंडे, अशासकीय महिला सदस्य मंजुषा सांळुके, विरोधी पक्षाचे सदस्य महेंद्र भागवत चौधरी, विरोधी पक्षाच्या महिला सदस्य वैशाली राजेंद्र चौधरी, रास्त भाव दुकानदारांचे प्रतिनिधी सदस्य यशवंत गोविंदा जासुद, अनुसूचित जमातीचे प्रतिनिधी यावल पंचायत समितीचे सदस्य सरफराज सिकंदर तडवी, अनुसुचित जातीच्या प्रतिनिधी चंद्रकला इंगळे, डोंगरकठोरा येथील सामाजिक कार्यकर्ता भोजराज तुकाराम पाटील यांची तर सदस्य सचिव म्हणुन तहसीलदार महेश पवार यांची निवड करण्यात आली आहे.


