भुसावळात भोरगाव लेवा पंचायती मेळाव्यात 15 जोडपे विवाहबंधनात

भोरगाव लेवा पंचायतीचा तिसर्‍या वर्षी स्तुत्य उपक्रम


भुसावळ : लग्नातील वाढता खर्च आणि अन्नाची होणारी नासाडी तसेच आर्थिक परीस्थितीमुळे गरीब कुटुंबातील वधू-वरांना येणार्‍या अडचणीवर मात करण्यासाठी भोरगाव लेवा पंचायतीतर्फे सामूहिक विवाह मेळाव्याचे गुरूवारी संतोषी माता हॉलमध्ये करण्यात आले. गेल्या तीन वर्षापासून भोरगाव लेवा पंचायतीतर्फे सामुहिक विवाहाचे आयोजन केले जात आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे नियमांचे पालन करून आठ जणांचा विवाह सामुहिक विवाह सोहळ्यात पार पडला होता. यंदा सुध्दा कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करीत सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले.

यांची मेळाव्याला उपस्थिती
यावेळी भोरगाव लेवा पंचायतीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव डॉ.बाळू पाटील, उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांच्यासह पंचायतीचे सर्व सदस्य विवाह सोहळ्यास उपस्थित होते. सामुहिक विवाह सोहळा यशस्वीतेसाठी भातु्र मंडळ पुणे, भंगाळे गोल्डचे भागवत भंगाळे, सुरेखा भंगाळे, निलीमा जंगले, ज्ञानेश इंगळे, भोरगाव लेवा पंचायतीचे भुसावळचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील, डॉ. बाळू पाटील, स्वागताध्यक्ष सुहास चौधरी, उपक्रम चेअरमन आरती चौधरी, महेश फालक, शरद फेगडे, डिगंबर महाजन, परीक्षीत बर्‍हाटे, आर.जी. चौधरी, मंगला पाटील, जयश्री चौधरी आदींनी परीश्रम आणि सहकार्य केले. विवाह सोहळ्यात कोरोनाचे नियम पाळण्यात आले.

यंदा पहिल्यांदाच समुपदेशन
सामुहिक विवाहाची टाळी वाजण्यापूर्वीच भोरगाव लेवा पंचायतीतर्फे सकाळी आठला उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी उपस्थित वधू-वरांना समुपदेशन केले. भोरगाव लेवा पंचायतीकडे किरकोळ कारणावरून फारकत घेण्यासाठी अनेकांचे अर्ज येत असतात, पती-पत्नीमधील वाद हे अत्यंत किरकोळ कारणावरून होत असतात, मात्र दोन्ही बाजून इगो असल्याने शेवटी संसार मोडण्यापर्यत त्यांची मजल जात असते. संसार म्हणजे भातुकलीचा खेळ नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा संसार मोडला. दोन्ही बाजूंनी समजुतदारपणा असल्यास संसार सुरळीत चालत असतो. त्यासाठी कोणीही वाद करू नये, समजुतीने, शांततेत, आनंदात संसार करावा. हल्ली विवाह जोडणे सुध्दा कठीण झाले आहे, आणि त्यातच पती-पत्नी विवाह मोडतात हे चुकीचे आहे. प्रत्येकाने संसार सुखाचा करावा,संसार करतांना प्रत्येकालाच तडजोड ही करावीच लागते तेव्हाच संसार यशस्वी होत असतो, त्यासाठी प्रत्येकाने चांगला संसार करावा असे आवाहन यावेळी आरती चौधरी यांनी सर्व नव वधू-वरांना केले.

असे दिले आंदण
सामुहिक विवाहात भोरगाव लेवा पंचायतीतर्फे नव वर-वधूंना गॅस शेगडी, दोन सिलेंडर, कपडे, मिक्सर यासह संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्यात. नवरदेव, नवरीकडील प्रत्येकी 15-15 लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी दिली होती, यात वाजंत्री, भटजी, व्यमुटीशियन याचाही खर्च भोरगाव लेवा पंचायतीतर्फे करण्यात आला.

45 लाखांची झाली बचत
भोरगाव लेवा पंचायतीतर्फे आयोजित केलेल्या सामुहिक विवाहात 15 जणांचे विवाह झाले. एका विवाहास तीन लाख रूपये जरी म्हटले तरी 15 विवाहांमधून सुमारे 45 लाख रूपयांची बचत झाली आहे. सामुहिक विवाहात पैश्यासोबतच अन्नाची सुध्दा बचत होत असते. त्यामुळे सामुहिक विवाहांचे आयोजन करीत असल्याचे सांगण्यात आले.

सर्वांना बांधले फेटे
लग्न सामूहिक असले तरी भोरगाव लेवा पंचायतीच्या सर्व सदस्यांनी फेटे बांधले होते तसेच सर्व 15 नवरदेवांनी सुध्दा फेटे बांधले होते. यावेळी भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठ्ू पाटील, अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, बी.के. चौधरी, भागवत भंगाळे, यादव बर्‍हाटे, सुरेखा भंगाळे, शालीनी पाटील, अशोक चौधरी, भाऊसाहेब फिरके, आरएम पाटील, राजेद्र फेगडे, अर्चना फेगडे, गजानन ठाकूर, विनीत पाटील, नेहल लाढे, दीपक चौधरी, प्रमोद धनगर, निलेश भोळे, उल्हास महाजन, मनोज जावळे, संजय महाजन, ज्योन्सा बर्‍हाटे, गिता चौधरी, निला चौधरी, सीमा गाजरे, प्राची राणे, वैशाली भगत, उज्वला महाजन, सुनंदा चौधरी, अर्चना चौधरी परीक्षीत बर्‍हाटे यांची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !