मधुचंद्रांच्या रात्रीनंतर तरुणाने उचलले धक्कादायक पाऊल !


कोलकाता : मधुचंद्राची रात्र संपताच विवाहित तरुणाने गळफास घेतला. पश्चिम बंगालमधील हावडा येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या बी. गार्डन ठाण्यांतर्गत शालिमार परीसरातील घटनेने खळबळ उडाली आहे. पोस्टमार्टेम रीपोर्ट आल्यानंतर मृत्यूच्या खर्‍या कारणांचा शोध लागणार आहे. मात्रसध्यातरी वराच्या मृत्यूच्या कारणाबाबतचं गुढ अद्याप कायम आहे. नववधूलाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. मधुचंद्राच्या रात्री असे काय घडले ज्यामुळे तिच्या पतीने जीवन संपवले, असा प्रश्न तिला पडला आहे.

पतीने अचानक घेतला गळफास
शालीमारनगरमधील आदर्श साव याचा विवाह बॅरकपूरमधील तरुणीशी झाला होता. बुधवारी वरात घरी पोहोचली. गुरुवारी मधुचंद्र आणि शुक्रवारी भोजनाचा कार्यक्रम होता मात्र शुक्रवारी सकाळी नववधू आंघोळ करून खोलीत आली तेव्हा तिने पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले आणि एकच खळबळ उडाली.त्याला खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नववधूने सांगितले की, लग्न ठरल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ते दोघेही संपर्कामध्ये होते. तसेच रोज फोनवरून बोलायचे. आम्हा दोघांनाही लग्नाचे वेध लागले होत. तसेच रोज फोनवरून बोलणेही होत होते. सर्व काही व्यवस्थित सुरू होते मात्र शुक्रवारी सकाळी असे काय घडले ते मला समजत नाही आहे. माझं जग वसण्याआधीच उद्ध्वस्त झालंय.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !