भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

शहर व ग्रामीणमध्ये विकासकामांचे उद्घाटन : आमदार मित्र मंडळातर्फे विशेष गौरव


भुसावळ : भुसावळचे लाडके आमदार संजय सावकारे यांचा शनिवार, 11 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने दिवसभर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतक व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून व सोशल मिडीयावरून शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसाचे औचित्य साधून शहर व ग्रामीण भागात विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, सायंकाळी स्टार लॉनमध्ये आमदार संजय सावकारे मित्र मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात आमदारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी आमदारांवर प्रेम करणार्‍या हितचिंतकांनी शुभेच्छा देत दीर्घायुष्याची कामना केली.

शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रम
वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी 9.30 वाजता म्युन्सीपल पार्कमध्ये नागरीकांना आरोग्य कार्डचे वाटप, सकाळी 10 वाजता भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी 11 वाजता तालुक्यातील हतनूर येथे ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातील निधीनुसार लावण्यात आलेल्या आरओ प्लॅण्टचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तसेच हतनूर येथे अंत्योदय योजनेंतर्गत दिव्यांग बांधवांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. सकाळी 11.30 वाजता तळवेल येथे म्हाळसा देवी मंदिरासमोर सभा मंडपाचे भूमिपूजन तर दुपारी 12 वाजता वाजता आचेगाव येथे अंतर्गत रस्ते व पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर तळवेल फाटा येथील साईबाबा मंदिरावर आरती तसेच बोहर्डी येथे सभा मंडपाचे भूमिपूजनही झाले.



भुसावळ शहरात विकासकामांचे उद्घाटन
शनिवारी दुपारी दोन वाजता टिंबर मार्केटजवळील अंडरपासजवळ काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन तसेच श्री नगर व विद्यानगराला जोडणार्‍या पुलाचे लोकार्पण करून वृद्ध महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम झाला. दुपारी अडीच वाजता मोहित नगरात डांबरीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर दुपारी तीन वाजता नवीन नगरपालिकेजवळील श्री गजानन महाराज नगरात काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला तसेच लहुलीला व वसुंधरा नगरात डांबरीकरणाचा शुभारंभ झाला तसेच दुपारी साडेतीन वाजता मामाजी टॉकीज रोडवर ई श्रम कार्ड व आरोग्य कार्ड, गमाडीया प्रेस रस्ता कामाचे भूमिपूजन तसेच दुपारी चार वाजता काळा हनुमान मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी साडेचार वाजता गांधी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या प्रभागातील गडकरी नगरात विकासकामांचे लोकार्पण, दुपारी पाच वाजता सर्वे क्रमांक 117/3 मध्ये व्यायामशाळा कामाचे लोकार्पण, सायंकाळी साडेपाच वाजता श्री हरी नगरात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ, सायंकाळी सहा वाजता स्व.मोहन पहेलवान चौक, मोहन बारसे नगर, बुद्धविहाराजवळ आरोग्य व ई श्रम कार्ड वाटपाचा कार्यक्रमही झाला.

शुभेच्छा देण्यासाठी उसळली अलोट गर्दी
शनिवारी रात्री आठ वाजता वांजोळा रोडवरील स्टार लॉमनध्ये आमदार संजय सावकारे मित्र मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात आमदारांचा भला मोठा हार घालून व केक कापून गौरव करण्यात आला. प्रसंगी जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हिंतचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, माजी नगरसेवक आदींनी आमदारांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत दीर्घायुष्यासाठी कामना व्यक्त केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !