वरणगावात उद्या शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक
वरणगाव : शहर शिवसेनतर्फे बुधवार, 15 रोजी दुपारी चार वाजता प्रतिभा नगरात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुंबई शिवसेना भवन येथून नवीन नियुक्ती झालेले नवनिर्वाचित भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख सुरेशजी राणे उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. वरणगाव शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांच्याशी ओळख परीचय आणि आगामी वरणगाव नगरपालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शिवसैनिकांशी चर्चा ते करतील. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे उपस्थित असतील. वरणगाव शहरातील शिवसैनिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी यांनी केले आहे.


