आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या यावलमध्ये काँग्रेसचा मेळावा
यावल : यावल शहर व तालुका काँग्रेसचा मेळावा बुधवार, 15 डिसेंबर रोजी शेतकी संघात दुपारी 12 वाजता होत आहे. राज्यात आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती, यावल तालुका व सहकारी संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात यावल तालुका व शहर काँग्रेस युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, अल्पसंख्यांक सेल, वैद्यकीय सेल लिगल सेल, किसान सेल, मागासवर्गीय सेल, ओ.बी. सी. सेल.च्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार असतील. मेळाव्याचे उद्घाटक हे प्रदेश उपाध्यक्ष तथा यावल-रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी असतील. मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, योगेंद्रसिंग पाटील, माजी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब संदीप पाटील, माजी आमदार रमेश चौधरी आदी उपस्थित राहतील. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस कमेटीचे यावल तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, काँग्रेस यावल कमेटी अध्यक्ष कदीर खान करीम खान आदींनी केले आहे.


