काय सांगता ! कोरोना काळात रेल्वेचे उत्पन्न घटले
मुंबई : कोरोनात रेल्वेला किती कमाई झाली ? असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला असता सरकारने या प्रश्नावर उत्तर दिले आहे. भारतीय रेल्वेला गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले आहे. म्हणजेच महसूलात मोठी घट झाली आहे तसेच रेल्वेने कर्मचार्यांना दिल्या जाणार्या भत्त्यांमध्ये काही कपात केली आहे का, यावर देखील उत्तर दिले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले की, 2019-20 मध्ये रेल्वेला झालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत 2020-21 मध्ये एकूण 34,145 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. ही घसरण प्रामुख्याने प्रवासी आणि अन्य कोचिंग महसूलामध्ये झाली आहे.
35 हजार 420 कोटींचे नुकसान
2019-20 मध्ये प्रवासी वाहतुकीतून झालेल्या कमाईचा आकडा हा 50669.09 कोटी रुपये होता. तर 2021 मध्ये ही कमाई 15,248.49 एवढी झाली. याचा विचार करता रेल्वेला कोरोना काळात 35,420.60 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच कोचिंग महसुलातून 2019-20 मध्ये रेल्वेला 4640.79 कोटी रुपये मिळाले होते. तर 2021 मध्ये ही कमाई निम्म्याहून कमी म्हणजेच 2096.76 कोटी रुपये झाली आहे. रेल्वेला यात 2544.05 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

माल वाहतुकीवर फायदा
2019-20 मध्ये रेल्वेला माल वाहतुकीतून 113487.89 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले. तर 2021 मध्ये फायदा झाला आहे. रेल्वेला यंदा 117231.82 कोटी रुपयांची कमाई झाली म्हणजे 3743.93 कोटी रुपयांचा फायदा झाला तर कर्मचार्यांच्या कोणत्याही भत्त्यामध्ये कपात करण्यात आली नाही, असे उत्तर सरकारने दिले आहे.
