संतापजनक : दुर्बल पतीच्या सांगण्यावरून मित्रांनी विवाहितेशी ठेवले संबंध


बारामती : आपल्या पत्नीशी संबंध ठेवण्याचा आग्रह लैंगिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या पतीने सांगितल्यानंतर महिलेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पीडीतेने तक्रार दिल्यावरून पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सन 2017 ते जुलै 2021 या कालावधीत ही घटना घडली. त्यानुसार पोलिसांनी पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या पतीविरोधात तिला जबरदस्तीने हे कृत्य करायला भाग पाडल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी
शहरानजीक फलटण रस्त्यावर ही फियार्दी महिला राहते. तिचा पती लैंगिकदृष्ट्या दुर्बल आहे. तिने इतरांशी संबंध ठेवण्यासाठी पतीकडून दबाव टाकला जात असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पिडीतेच्या मोबाईलवरून तो मित्रांना मेसेज करून घरी बोलावून घेत असे. पत्नीने विरोध केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे देखील फिर्यादीत नमुद आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !