अवघ्या दहा रुपयांसाठी गमावला प्रवाशाने जीव : रीक्षा चालकाला अटक


औरंगाबाद : कमी भाड्याच्या कारणावरून झालेल्या वादात प्रवाशाने जीव गमावला. औरंगाबाद शहरात मंगळवारी ही घटना घडली. मिर्झा मुजफ्फर हुसेन मिर्झा आली हुसेन (52, रा.सईदा कॉलनी, जटवाडा रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुजफ्फर हे मंगळवारी मिल कॉर्नर येथून कामाक्षी चौकात जाण्यासाठी रीक्षा (एम.एच.20 इ.एफ 0012) बसले. साडेसहा वाजेच्या सुमारास चौकात उतरल्यानंतर त्यांनी नेहमीपमाणे रीक्षा चालक सालम बिन उर्फ बाबा सुलेमान आलम बावजिरवय (50, रा.चेलीपुरा मुर्गी नाला) याला 10 रुपये दिले. दिलेले 10 रुपये घेण्यास नकार देत सालम बिन याने पेट्रोल महागल्यामुळे 20 रुपये देण्याची मागणी केली. त्यातुन दोघात बाचाबाची झाली.

जबर ठोशामुळे प्रवाशाचा मृत्यू
प्रवासी व रीक्षा चालका यांच्यात झालेल्या बाचाबाचीत सालम बिन याने मुजफ्फर यांच्या नाकावर ठोसा मारला. हा ठोसा जबर बसल्यामुळे त्यांच्या नाकातुन रक्त येऊ लागले. जखमी अवस्थेत ते घाटी रुग्णालयात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

रीक्षा चालकाला अखेर अटक
या प्रकरणी मयताच्या पुतण्याच्या तक्रारीवरून रीक्षा चालकाविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मुंढे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !