आवाजी मतदानाने होणार विधानसभा अध्यक्षांची निवड
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानं होणार आहे. विधानसभा नियम समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 22 डिसेंबरला विधी मंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियम बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, नियम समितीच्या बैठकीत भाजप सदस्यांनी याला विरोध केला.
ठोस कारण नसताना निर्णय का? भाजपाचा सवाल
उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्रात बदलण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसताना हा निर्णय का घेतला जातोय? असा मुद्दा भाजप सदस्यांनी बैठकीत आज उपस्थित केला. नियम समितीच्या बैठकीत भाजप सदस्य डॉ संदीप धुर्वे, जयकुमार गोरे, धनंजय गाडगीळ यांनी नियम बदलाला तीव्र विरोध केला. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्रात बदलण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसताना हा निर्णय का घेतला जातोय ? असा मुद्दा भाजप सदस्यांनी बैठकीत आज उपस्थित केला.


