कर्ज झाले, पीकही वाया गेले, मुलीला तू आता अंत्ययात्रेलाच ये म्हणत शेतकर्‍याची आत्महत्या


वडवणी : मोठे कर्ज झाले असून शेतातील पीकदेखील यंदा आले नाही त्यामुळे असहाय झालेअसून तू लवकर निघ मी शेतात आत्महत्या करीत आहे, असे म्हणत असहाय शेतकर्‍याने आत्महत्या केली. बालासाहेब लक्ष्मण गोंडे (रा.चिंचोटी, ता.वडवणी) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. बुधवारी पहाटे वडवणी तालुक्यातील चिंचोटी गावात ही घटना घडली.

व्यथित होत केली आत्महत्या
गोंडे यांची तालुक्यातील पिंपरखेड शिवारातील पांढरी येथे दीड एकर शेती आहे. मंगळवारी रात्री त्यांनी घरातील लोकांना शेतात चाललो आहे. गोठ्यावरच झोपतो’ असे सांगितले. बुधवारी सकाळी 6 वाजता गोंडे यांनी नादलगाव येथील त्यांच्या सासरी असलेल्या मुलीला फोन लावला व कर्ज फेडण्यास आपण असमर्थ असल्याचे व्यथित होऊन सांगितले व फोन कट केला. त्यांचे कुटुंबीय शेतात पोहोचेपर्यंत गोंडे यांनी गळफास घेतला होता. वडवणी पोलिसांनी शेतात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. गोंडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक अविवाहित मुलगी व दोन विवाहित मुलींसह 10 वर्षाचा एक मुलगा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !