उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर
जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा दौर्यावर येत असून जिल्हा प्रशासनाला त्यांचा दौरा प्राप्त झाला आहे.
असा आहे दौर्याचा कार्यक्रम
शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.55 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमनानंतर सकाळी 8.15 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा व जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 विषाणू प्रादूर्भाव व उपाययोजनांचा आढावा, सकाळी 10.50 वाजता मोटारीने प्रयाण, सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हा दुध संघाचे आवार, शिवाजीनगर, जळगाव येथे आगमन, सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव- नवीन आधुनिक दूध प्रक्रिया व पॅकींग प्लँट आणि नविन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उद्घाटन सोहळा होईल.


भुसावळात विविध विकासकामांचे उद्घाटन
भुसावळात विविध विकासकामांचे उद्घाटनशुक्रवार, 17 रोजी दुपारी 12.20 ते 1.00 वाजेपर्यंत राखीव, दुपारी 1.30 वाजता जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळा लोर्कापण, दुपारी 1.30 वाजता भुसावळ नगरपरीषषद आयोजित विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा, दुपारी 2.45 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.हायस्कुल ग्राऊंड, भुसावळ) येथे आगमन तसेच दुपारी 2.45 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थिती, दुपारी 4.15 वाजता शॉप क्रमांक 5-6, नवशक्ती आर्केड, जामनेर रोड, भुसावळ जि.जळगाव येथे आगमन. दुपारी 4.15 वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उद्घाटन (फीत कापणे), सायंकाळी पाच वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण असा दौरा आहे.
