जळगावात दुध संघाच्या नवीन युनिटचे थाटात उद्घाटन
जळगाव : जळगाव जिल्हा दौर्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते शुक्रवारी जळगाव जिल्हा दुध संघाच्या नवीन शीतकरण आणि दूध प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. दुध संघाचा विकास या ब्रँडच्या माध्यमातून नव्यानेच उत्पादीत करण्यात आलेल्या विविध दूग्धजन्य प्रॉडक्टचे लाँचीग देखील करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि दूध संघाच्या संचालक उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर दुध संघातर्फे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.


