भुसावळातील गुंडगिरी ठेचून काढा : अजित पवार

भुसावळात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण व विकासकामांचे उद्घाटन


भुसावळ : पोलिसांनी भुसावळातील गुन्हेगारी ठेचून काढावी यासाठी मी आत्ताच सूचना देत आहे. शहरात जातीय सलोखा राखला जाणे गरजेचे आहे. कुणीही व्यक्ती चुकत असेल त्याला सरळ करणे पोलिसांचे काम असल्याचा मार्मिक टोलाही त्यांनी येथे हाणला. शुक्रवार, 17 रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्याहस्ते पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

विकासकामांचे ऑनलाईन उद्घाटन
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते भुसावळ पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ऑनलाईन रीमोटची कळ दाबून करण्यात आले. तत्पूर्वी जुना सातारा भागातील लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.



यांची व्यासपीठावर उपस्थिती
पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार अनिल भाईदास पाटील (अमळनेर), लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा निमंत्रक अविनाश आदिक, नगरसेवक मुकेश पाटील, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रा.दिनेश राठी, अमोल इंगळे, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी मकासरे, शैलजा नारखेडे, पिंटू ठाकूर, सविता अहिरे, पूजा सूर्यवंशी, माजी नगरसेवक वसंत पाटील, दिनेश नेमाडे, शफी पहेलवान, शरीफ ठेकेदार, पुरूत्तोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, अजय नागराणी तसेच जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार संजय सावकारे म्हणाले ; अजित दादा, पुन्हा-पुन्हा भुसावळात या ! 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !