आमदार संजय सावकारे म्हणाले ; अजित दादा, पुन्हा-पुन्हा भुसावळात या !


भुसावळ : सोशल मिडीयावर जो तो नागरीक उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी पुन्हा-पुन्हा भुसावळात यावे, असे म्हणत आहे, एकाने तर हे लीप ईअर आहे का? असा प्रश्नदेखील विचारल्याचे आमदार संजय सावकारे यांनी आपल्या भाषणातून म्हणताच व्यासपीठावर खळबळ उडाली. आपल्या मुद्देसुद भाषणातून त्यांनी पालिकेच्या अनेक मुद्द्यांवर बोट ठेवल्याचे दिसून आले पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण शुक्रवार, 17 रोजी दुपारी दोन वाजता जुना सातारा भागात झाले. यावेळी आमदार सावकारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

आमदार म्हणाले : ही कामे तर फार पूर्वीच होणे गरजेचे होते
आमदार म्हणाले की, शहरात स्वच्छतेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून रस्त्यांची कामेदेखील होत आहेत त्यामुळे ही कामे फार पूर्वीच झाली असती तर बरे झाले असते मात्र उशिरा का होईना कामे होत असल्याचे समाधान आहे. अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची बिकट परीस्थिती निर्माण झाली असून हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करीत शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा निधी द्यावा, अशी मागणीही केली. पालिकेतील रीक्त पदांचा प्रश्न, अमृतच्या वाढीव प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी अजितदादांकडे केली.



यांची व्यासपीठावर उपस्थिती
पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार अनिल भाईदास पाटील (अमळनेर), लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा निमंत्रक अविनाश आदिक, नगरसेवक मुकेश पाटील, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रा.दिनेश राठी, अमोल इंगळे, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी मकासरे, शैलजा नारखेडे, पिंटू ठाकूर, सविता अहिरे, पूजा सूर्यवंशी, माजी नगरसेवक वसंत पाटील, दिनेश नेमाडे, शफी पहेलवान, शरीफ ठेकेदार, पुरूत्तोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, अजय नागराणी तसेच जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !