झारीतल्या शुक्राचार्यांनी केला भुसावळचा सत्यानाश केला : पालकमंत्री गुलाबराव पाटील


भुसावळ : भुसावळ पालिकेत येथे सीओ यायला तयार नव्हते मात्र आम्ही ते आणले व ते आता पोलिस संरक्षणात काम करीत आहेत, असे महाराष्ट्रात कुठेही घडल्याचे उदाहरण नाही, पोलिसांवर हात उचलण्याची मजल येथल्या गुन्हेगारांची झाल्याने आय, आयपीएस दर्जाचे अधिकारी शहराला मिळावेत, अशी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे उपमुख्यमंत्र्यांकडे केली. भुसावळ पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण शुक्रवार, 17 रोजी दुपारी दोन वाजता जुना सातारा भागात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.

आमदार संजय सावकारे म्हणाले ; अजित दादा, पुन्हा-पुन्हा भुसावळात या ! 

मृत्यू अटळ तर दहा दिवसच मर्दासारखे जगायला आवडेल
आपल्या आक्रमक शैलीत गुलाबराव म्हणाले की, शहरातील काही शुक्राचार्यांनी शहराचा सत्यानाश केला असून काही गुंडाचा शहरात प्रभाव वाढल्याने त्यांच्यावर वचक निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगून त्या गुंडामागे नगरसेवकांनीदेखील उभे राहण्याची गरज नसल्याचा टोला त्यांनी कुणाचेही नाव न घेतला हाणला. मृत्यू जर अटळ आहे तर दहा दिवस मर्दासारखे जगायला आवडेल, असेही ते म्हणाले. भुसावळात खेळण्याच्या बंदुकांप्रमाणे कट्टे उपलब्ध होत असून सोन्याच्या चैन लांबवणे काहींचा धंदा झाल्याने गुन्हेगारी रोखणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.



भुसावळातील गुंडगिरी ठेचून काढा : अजित पवार 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !