बंगळूरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना करणार्‍या समाजकंटकाला अटक करा

वरणगाव शिवसेनेतर्फे कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी : पोलिस प्रशासनाला निवेदन


वरणगाव : बंगळूरू येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांची विटंबना करणार्‍या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या गंभीर बाबीचा क्षुल्लक बाब म्हणून उल्लेख केल्याने वरणगावातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत या संदर्भात वरणगाव पोलिस प्रशासनाने निवेदन दिले. वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांनी निवेदन स्वीकारले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, उप जिल्हाप्रमुख उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, उपशहर प्रमुख सुखदेव धनगर, हिप्पी शेठ, शेख सईद शेख भिकारी, संतोष माळी, निलेश ठाकूर, मनोज वाणी, प्रल्हाद. माळी, विवेक माळी, प्रशांत माळी, शुभम माळी, दीपक शेळके, पवन चौधरी, दीपक बढे, उमाकांत झांबरे, यशवंत बढे, राहुल वंजारी, अरबाज पहेलवान यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !