मुलीच्या गळ्याला चाकू लावत नराधमाचा महिलेवर बलात्कार


नाशिक : पीडीत महिलेच्या मुलीला चाकू लावत नराधमाने महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून नाशिक जिल्ह्यातील सातपूर पोलिसांनी आरोपी आजाद शेखला अटक केली आहे. वारंवार महिलेला धमकी देत आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

ठिकठिकाणी अत्याचाराचा आरोप
महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत म्हटलंय की, आरोपीने त्र्यंबकेश्वरच्या एका लॉजमध्ये 17 डिसेंबर रोजी रात्रभर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने आरोपीच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिच्या छोट्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याचप्रकारे त्याने धमकी देत पीडित महिलेवर विविध ठिकाणी अनेकदा बलात्कार केले.

मित्राच्या घरीही केला बलात्कार
आरोपी आजाद शेखने संबंधित महिलेसोबत 17 डिसेंबरला रात्री लॉजवर बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेला मित्राच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणीही आरोपीने महिलेवर अतिप्रसंग केला. त्यानंतर महिलेला सोडून दिलं आणि नाशिकमधून पळण्याचा प्रयत्न केला. आरोपी रेल्वे स्टेशनला पोहचला होता आणि बाहेर जाणार्‍या गाडीची वाट पाहत होता परंतु पोलिसांना त्याची कारनाम्याची भनक लागली. तातडीने पोलिसांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन गाठलं आणि आरोपीला पकडण्यात यश आलं. या महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी आजाद शेखवर कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !