धक्कादायक : विवाहितेला पळवून नेत दोघांनी केला अत्याचार


सोलापूर : विवाहित महिलेला फूस लावून पळवून पुण्यात आरोपीसह त्याच्या मित्राने अत्याचार केला. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस ठाण्यात आरोप गणेश नरळे, विष्णू बरगंडे (दोघे रा. सोलापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनैतिक संबंध सांगण्याची धमकी देत अत्याचार
गणेश नरळे हा नात्यातील महिलेला सतत बोलत होता. एप्रिल 2018 मध्ये तो अचानक घराजवळ आला. बोलत बोलत त्याने विवाहित महिलेला माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणाला. महिलेने माझे लग्न झाले आहे, चार मुले आहेत, तुला माहीत नाही का? असे म्हणून हाकलून दिले होते. मात्र गणेश याने मला दोन दिवसात सांग अन्यथा तुझे व माझे अनैतिक संबंध आहेत, अशी बदनामी करण्याची धमकी दिली. दोन दिवसानंतर तो पुन्हा घरी आला व त्याने मला तुझ्याकडून नकार नकोय, आज रात्री मी तुला घरी भेटायला येतो असे म्हणून निघून गेला. महिलेने त्याला तिच्या दुसर्‍या घरी येण्यास सांगितले. गणेश नरळे हा तिच्या दुसर्‍या घरी गेला व तेथे तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर सातत्याने असा प्रकार घडू लागला.

आत्महत्या करण्याची दिली धमकी
विवाहितेने त्याचा संपर्क कमी केला तेव्हा त्याने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली. शेवटी महिलेला फूस लावून 28 ऑक्टोबर 2020 ला मोटारसायकलवर बसवून पुणे येथे पळवून नेले. तेथे 45 दिवस झाल्यानंतर गणेश नरळे याला त्याच्या मित्राचा फोन आला. मित्र म्हणाला की, महिलेचा भाऊ विनंती करीत आहे, तिला चार मुले आहेत. आम्ही काही म्हणणार नाही, बहिणीला आणून सोड, तेव्हा गणेश नरळे याने महिलेला सोलापूरला सोडले होते.

दुसर्‍यांदा दिली आत्महत्या करण्याची धमकी
जानेवारी 2021 मध्ये पुन्हा गणेश फोनवर तो बोलताना म्हणाला की, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू निघून ये अन्यथा मी आत्महत्या करेन. मुलांना मारून टाकेन, बदनामी करेन अशी धमकी दिली. पुन्हा 8 जानेवारी 2021 रोजी महिला पुण्यात गणेश याच्याकडे गेली. तेथे त्याने तिला भाड्याने खोली घेऊन ठेवले. एके दिवशी त्याचा मित्र विष्णू हादेखील घरी आला. गणेश नरळे हा घरातून बाहेर गेला व त्याने बाहेरून कडी लावली. आतील मित्राने धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर दोघांनीही हा प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. महिला सोलापुरात पळून आली त्यानंतर तिने पुन्हा जाऊन दोघांविरुद्ध फिर्याद दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !