भुसावळ तालुका ग्रामपंचायत पोटनिवडणूक : अवघ्या दहा मिनिटात जाहीर झाला निकाल


भुसावळ : तालुक्यातील फुलगाव व वांजोळा ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकीसाठी मंगळवारी निवडणूक झाली. मतमोजणी बुधवारी सकाळी 10.30 वाजता होवून अवघ्या दहा मिनिटात निकाल हाती आले.

यांनी मिळवला निवडणुकीत विजय
गोजोरा, कठोरा बुद्रूक, पिंप्रीसेकम, निंभोरा बुद्रूक येथील जागा बिनविरोध निवडणूक आल्यात. वांजोळा येथील पोट निवडणुकीत वॉर्ड एकमधून मंगला ठाणसिंग भील यांना 182 मते मिळवून विजयी झाल्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी मनिषा कमलाकर मोरे यांना 177 मतांवर समाधान मानावे लागले. फुलगाव येथील वॉर्ड दोनमधील पोट निवडणुकीत शाम फुलगावकर यांना 316 मते मिळून ते विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी मोहित झांबरे यांना 197 मतांवर समाधान मानावे लागले. फुलगाव येथील निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळाधिकारी योगीता पाटील यांनी जाहीर केला तसेच वांजोळा येथील निकाल मंडळाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सतिश इंगळे यांनी जाहीर केले. त्यांना तलाठी यु.आर. बारी यांनी सहकार्य केले. यावेळी तहसीलदार दीपक धिवरे, नायब तहसीलदार एस.जे. इंगळे. भगवान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली.



या उमेदवारांची बिनविरोध निवड
भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथून सुरेखा रवींद्र कोळी या वॉर्ड दोनमधून बिनविरोध निवडल्या गेल्या. कठोरा बुद्रूक येथून वॉर्ड दोन मधून हेमंत बाळू कोळी, पिंप्रीसेकम, निंभोरा बुद्रूक येथून सीमरनप्रीत चाहेल व मिराबाई पंडीत पवार हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !