53 हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले
जळगाव : शहरातील तुकारामवाडी येथे घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याची मंगल पोत व कानातील टोंगल मिळून सुमारे 53 हजारांचे दागिणे चोरून नेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्याचा शोध सुरू
दीपक समाधान बाविस्कर (22, रा.तुकाराम वाडी, पीपल्स बँकेजवळ जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे दुमजली इमारतीचे घर आहे. 17, डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या खालच्या घरात कुणीही नसतांना किचनमधील लोखंडी कपाटातून 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत आणि 18 हजार रुपये किंमतीचे टोंगल असा एकूण 53 हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवले. या प्रकरणी बुधवार, 22 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार योगेश सपकाळे करीत आहे.




